मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबतची कार्यपध्दती,
Procedure Regarding Chief Minister's Medical Assistance Fund.
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” या न्यासाची नोंदणी करण्यात आलेली असून मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन केले जाते तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहतात. उद्दिष्टे:- | ||||||||||||||||||||||||||||||||
शासन निर्णय क्रमांक सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि. १५/११/२००१ अन्वये या निधीची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आलेली आहेत. ती खालीलप्रमाणे -
|
योजनेविषयी सविस्तर:-
मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेचा एक भाग म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी होय, वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज करताना खालील आरोग्याच्या शासकीय योजनांचा योग्य वापर होण्यासाठी या योजनांची प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी त्यामध्ये...
१) रुग्णालयातून रुग्ण डिस्चार्ज झाल्यामुळे त्याची शहानिशा करणे शक्य नसल्याने अशा रुग्णांना अर्थसहाय्य देणे शक्य नाही.
२) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (मोफत उपचार) :- या योजनेच्या संबंधित आपल्या जिल्ह्याच्या समन्वयकास फोन करून शासनाने नामनिर्देशित केलेल्या दवाखान्यात ऍडमिट करावे. या योजने संबंधित अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
३) चॅरिटी हॉस्पिटल (मोफत व सवलतीच्या दरात उपचार) :- जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या चॅरिटी हॉस्पिटल मधील बेडची माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर यांच्याकडून घेऊन त्याप्रमाणे त्या ठिकाणी रुग्णास ऍडमिट करावे. अधिक माहितीसाठी वेबसाईट लिंक खालील प्रमाणे.
४) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK (मोफत उपचार) :- या योजनेमध्ये ० ते १८ वयोगटातील मुलांवर मोफत उपचार केले जातात यासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात अथवा जिल्हा समन्वयकास संपर्क साधून त्याप्रमाणे रुग्णास ऍडमिट करावे यासंबंधीची माहिती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे.
५) मुख्यमंत्री सहायता निधी :-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे
1. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6)
2. हृदय प्रत्यारोपण
3. यकृत प्रत्यारोपण
4. किडणी प्रत्यारोपण
5. बोन मॅरो प्रत्यारोपण
6. फुफ्फुस प्रत्यारोपण
7. हाताचे प्रत्यारोपण
8. हिप रिप्लेसमेंट
9. कर्करोग शस्त्रक्रिया
10. अपघात शस्त्रक्रिया
11. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
12. मेंदूचे आजार
13. हृदयरोग
14. डायलिसिस
15. अपघात
16. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
17. नवजात शिशुंचे आजार
18. गुडघ्याचे प्रत्यारोपण
19. बर्न रुग्ण
20. विद्युत अपघात रुग्ण
वरील तिन्ही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत वैद्यकीय समितीमार्फत तपासणी करून अर्थसहाय्य केले जाते.
संपर्क क्र. 022-22026948
संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जातो तसेच रुग्णांचे नातेवाईक संपर्क साधू शकतात.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर यादी/माहिती खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे.
योजने संबंधित महत्त्वाच्या बाबी:-
∆ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम RBSK, धर्मदाय रुग्णालये या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये उपलब्ध सीमित निधीचा वापर करून वरील योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना लाभ देण्यात येतो.
∆ राज्याबाहेरील रुग्णालयांवर राज्य शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्याकडून उपयुक्तता प्रमाणपत्र घेणे शक्य नसल्याने राज्याबाहेरील रुग्ण/रुग्णालयांसाठी अर्थसहाय्य करणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे.
∆ मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार २५०००, ५००००,१ लाख व महत्तम २ लाख पर्यंत आजारनिहाय मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-
१)अर्ज (विहीत नमुन्यात) Click Here
२)वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह...
(खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३)तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. (रु.१.६० लाखपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे.)
४)रुग्णाचे आधारकार्ड. (महाराष्ट्र राज्याचे)
५)संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
६)रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
७)अपघात असल्यास, FIR असणे आवश्यक आहे.
८)अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे:-
अर्थसाह्याची मागणी ई-मेल द्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे pdf स्वरूपात (वाचनीय) पाठवून त्यांच्या मूळ प्रती तात्काळ टपालाने मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे पाठविण्यात यावेत.
e-mail address:- aao.cmrf-mh@gov.in
अ.क्र | माहितीचा तपशील | Download लिंक |
१. | Official वेबसाईट | Click Here |
२. | महत्त्वाचे शासन निर्णय | Click Here |
३. | नेहमीचे प्रश्न | Click Here |
४. | स्थापना व उद्दिष्टे | Click Here |
५. | अभिप्राय/Feedback | Click Here |
६. | अर्ज/Application Form | Click Here |
७. | पंतप्रधान सहाय्यता निधी लिंक | Click Here |
८. | अर्जाची सद्यस्थिती | Click Here |
0 Comments