मुरुड जंजिरा :- मुरुड जंजिरा जिल्हा रायगड सारख्या दुर्गम भागामध्ये गरजू गरीब व आदिवासी गरोदर मातांसाठी मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सिझेरियन सुविधा माननीय वैद्यकीय अधिक्षक डॉ.उषा बा.चोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी स्री रोगतज्ञ डॉ.मंगेश पाटील, भूलतज्ञ डॉ. तुषार राजपूत यांचे सहकार्य या रुग्णालयास लाभले असून आत्तापर्यंत ०३ सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी झालेले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग रायगड यांच्यामार्फत प्रसूती कक्ष अत्याधुनिक करण्यात आलेला आहे.त्याचे मागील वर्षी नोव्हेंबर मध्ये लोकार्पण माननीय श्री.महेंद्रशेठ दळवी,आमदार अलिबाग-मुरुड विधानसभा व माननीय जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.अंबादास देवमाने व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.
यासोबतच गरोदर मातांना जाण्या-येण्यासाठी 102 रुग्णवाहिका सेवा, मातांच्या दैनंदिन तपासण्या,लसीकरण,औषधोपचार, मोफत आहार, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मातांची मोफत सोनोग्राफी यासारख्या सुविधा दिल्या जातात त्यामुळे सदरच्या अत्याधुनिक प्रसुती कक्ष व इतर सोयी सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.
दैनिक कृषीवल 16.06.2024
अत्याधुनिक प्रसुती कक्ष
0 Comments