मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” या न्यासाची नोंदणी करण्यात आलेली असून मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन केले जाते तसेच माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहतात.
उद्दिष्टे:-
शासन निर्णय क्रमांक सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि. १५/११/२००१ अन्वये या निधीची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आलेली आहेत.
ती खालीलप्रमाणे -
- राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.
- जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
योजनेविषयी सविस्तर:-
मुख्यमंत्री सहायता निधी या योजनेचा एक भाग म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी होय, खालील 5 आरोग्य योजनांचा व इतर कोणत्याही प्रकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत 🔗 नोंदणीकृत रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वैद्यकीय समितीमार्फत तपासणी करून अर्थसहाय्य केले जाते.
त्यामध्ये ----
१) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (मोफत उपचार) :-
या योजनेच्या संबंधित आपल्या जिल्ह्याच्या समन्वयकास फोन करून शासनाने नामनिर्देशित केलेल्या दवाखान्यात ऍडमिट करावे. या योजने संबंधित अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
🔗 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
२) चॅरिटी हॉस्पिटल (मोफत व सवलतीच्या दरात उपचार) :-
जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या चॅरिटी हॉस्पिटल मधील बेडची माहिती जिल्हा धर्मादाय कार्यालयातून अथवा खालील वेबसाईटवरून घेऊन त्याप्रमाणे त्या ठिकाणी रुग्णास ऍडमिट करावे.
अधिक माहितीसाठी पोर्टल लिंक व माहिती खालील प्रमाणे.
🔗 धर्मदाय आयुक्तालय,महाराष्ट्र शासन
🔗 धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष (Portal Link)
प्रस्तावना
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ अ अ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता सदरची योजना तयार केली आहे. त्यानुसार,
“प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १०% खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १०% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे.”
सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गृह, विधि व न्याय विभागाच्या दि.३१.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा ७ वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहे.
उद्देश :-
राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांतील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करुन देणे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम,१९५० च्या कलम ४१ अ अ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र.३१३२ / २००४ मध्ये दिलेल्या न्याय निर्णयानुसार तयार केलेल्या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करणे.
धर्मादाय रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची वस्तुस्थिती, निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना आरोग्य सेवांसाठी योग्य प्रवेश प्रदान करणे.धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा रुग्णांना पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी त्यावर केंद्रीकृत पध्दतीने देखरेख ठेवणे व योजनेची प्रभावी अंमलबाजवणी करणे.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला योग्य रुग्णसेवा व उपचार मिळत असल्याची खात्री करणे.
अधिक माहितीसाठी___जिल्हास्तरीय धर्मादाय रूग्णालय मदत कक्षला येथे संपर्क करा.
३) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK (मोफत उपचार) :-
या योजनेमध्ये ० ते १८ वयोगटातील मुलांवर मोफत उपचार केले जातात यासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात अथवा जिल्हा समन्वयकास संपर्क साधून त्याप्रमाणे रुग्णास ऍडमिट करावे यासंबंधीची माहिती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे. महाराष्ट्र सद्यस्थिती rbsk अंतर्गत 77 रुग्णालय आहे.
🔗 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
४) राज्य कामगार विमा योजना (ESIC) :-
५) पोलीस कुटुंब आरोग्य योजना (MPKAY) :-
६) मुख्यमंत्री सहायता निधी :-
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून 20 प्रकारच्या गंभीर,दुर्धर आजारासाठी मदत मिळते त्या आजारांची यादी/माहिती खालीलप्रमाणे :-
- 1. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6)
- 2. हृदय प्रत्यारोपण
- 3. यकृत प्रत्यारोपण
- 4. किडणी प्रत्यारोपण
- 5. बोन मॅरो प्रत्यारोपण
- 6. फुफ्फुस प्रत्यारोपण
- 7. हाताचे प्रत्यारोपण
- 8. हिप रिप्लेसमेंट
- 9. कर्करोग शस्त्रक्रिया
- 10. अपघात शस्त्रक्रिया
- 11. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
- 12. मेंदूचे आजार
- 13. हृदयरोग
- 14. डायलिसिस
- 15. अपघात
- 16. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
- 17. नवजात शिशुंचे आजार
- 18. गुडघ्याचे प्रत्यारोपण
- 19. बर्न रुग्ण
- 20. विद्युत अपघात रुग्ण
- अर्ज (विहीत नमुन्यात) Pdf.अर्जासाठी 👉Click Here
- रुग्ण दाखल असल्यास Geo Tag फोटॊ सादर करावा.
- वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह...(खाजगी रुग्णालय असल्यास - मा.जिल्हा शल्यचिकित्सक, यांच्याद्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
- (New :- नवीन मार्गदर्शक सूचनानुसार आजारासंबंधी अंदाजपत्रके प्रमाणित करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलेला आहे.)
- तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. (रु.१.६० लाखपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे.)
- रुग्णाचे आधारकार्ड. (महाराष्ट्र राज्याचे) लहान बालकांसाठी आईचे आधार कार्ड.
- संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
- रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
- 🔗 संगणक प्रणाली वरील हॉस्पिटल पाहण्यासाठी - 👉Click Here
- अपघात झाला असल्यास, FIR/पोलीस डायरीची प्रत जोडणे आवश्यक आहे.(MLC रिपोर्ट ग्राह्य धरण्यात येणार नाही.)
- अर्जामध्ये नमूद केलेल्या आजाराबद्दलची सर्व कागदपत्रे (एक्सरे Report,CT स्कैन, MRI रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स, इत्यादी) संपूर्ण रिपोर्ट जोडावे.
- अवयव प्रत्यारोपण असल्यास मॅचिंग रिपोर्ट तसेच ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
अ.क्र | माहितीचा तपशील | Download लिंक |
१. | Official वेबसाईट | Click Here |
२. | महत्त्वाचे शासन निर्णय | Click Here |
३. | नेहमीचे प्रश्न | Click Here |
४. | स्थापना व उद्दिष्टे | Click Here |
५. | अभिप्राय/Feedback | Click Here |
६. | अर्ज/Application Form | Click Here |
७. | पंतप्रधान सहाय्यता निधी लिंक | Click Here |
८. | अर्जाची सद्यस्थिती (cmrf) योजना | Click Here |
९. | ऑनलाईन देणगी | Click Here |
१०. | रुग्ण मित्र वेबपोर्टल | Click Here |
११. | चॅरिटी हॉस्पिटल हेल्प पोर्टल | Click Here |
१२. | नेहमीचे प्रश्न_charity hospital | Click Here |
१३. | वैद्यकीय मदत - सिद्धिविनायक ट्रस्ट | Click Here |
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे महत्त्वाचे पाऊल ! क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून उपचाराचा मार्ग झाला मोकळा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी : गरजू रुग्णांसाठी आश्वासक आधार 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत
- सिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान
- मुख्यमंत्री सहायता निधी व टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या समन्वयातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस
- धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक स्थापावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या पुढाकाराने चिमुकल्या देवांशीवर यशस्वी शस्त्रक्रिया
- ‘श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी
- ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ पंधरवड्याला सुरुवात
0 Comments