योजनेची सुरुवात ०१ जानेवारी २०१७
PMMVY प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (पूर्वीचे नाव :- इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना) ही योजना केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेली आहे.यामध्ये केंद्र सरकारचा ६०% व राज्य सरकारचा ४०% वाटा आहे.कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी गर्भवती माता व स्तनदा माता यांना सदरील योजना लागू आहे.(वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांसाठी सदरील योजनेचा लाभ लागू नाही.)
या योजनेमध्ये रुपये ५०००/- तीन टप्प्यांमध्ये काही निकष व अटी यांची पूर्तता केल्यानंतर रक्कम लाभार्थ्याच्या खात्यामध्ये (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे जमा केली जाते.
योजनेचे अधिकारी:-
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवांचे आयुक्त हे राज्य पातळीवरील समन्वय अधिकारी असतील.
सेवा मिळण्याचे ठिकाण:-
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालय त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच अधिक माहितीसाठी आरोग्य सेविका/आरोग्य सेवक,आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा.
सेवा मिळण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे:-
•माता आणि बाल सुरक्षा कार्ड.
•लाभार्थी आणि तिच्या पतीचे आधार कार्ड झेरॉक्स.
•लाभार्थ्याचे आधार कार्डशी जोडलेले स्वतंत्र बँक खाते पासबुकची झेरॉक्स.
•नवजात बालकाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र व प्राथमिक लसीकरण आवश्यक आहे.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती दिवसात सेवा पुरवली जाईल.
लाभार्थ्याची माहिती शासनाच्या पोर्टल वरती भरल्यानंतर किमान 30 दिवसाच्या आत रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केली जाते.
योजनेची ध्येय:-
∆माता व बालकांमधील प्रतिबंधात्मक मृत्यू रोखणे.
∆विकृती व उपजत मृत्यू कमी करणे.
∆प्रसूतीच्या वेळी व प्रसूती पश्चात लगेचच दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये वाढ करणे.
∆लाभार्थ्यांची वाढ करणे.
∆आदरयुक्त मातृत्व देखभाल सेवा देणे इत्यादी.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश:-
•प्रसूतीगृह,माता शस्त्रक्रिया गृह,आय.सी.यु व एच.डी.यु यामध्ये गुणात्मक व दर्जात्मक सुधारणा करून माता व नवजात बालक यांना प्रसूतीच्या अगोदर व नंतरच्या सेवा देणे.
•या योजनेमार्फत सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जिल्हा रुग्णालय व संदर्भ सेवा देणारे रुग्णालय यांना कार्यान्वित करणे.
•या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी करणे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अ.क्र |
तपशील |
डाऊलोड |
०१ |
फॉर्म नमुना A |
|
०२ |
फॉर्म नमुना B |
|
०३ |
फॉर्म नमुना C |
|
|
Android Mobile App |
|
|
|
|
|
|
|
योजने संबंधित महत्त्वाचे दुवे:-
National Immunization Schedule (NIS) for Infants First Cycle of Immunization
0 Comments