सुंदर माझा दवाखाना | ग्रामीण रुग्णालय मुरुड-जंजिरा,जिल्हा-रायगड.


सुंदर माझा दवाखाना

मराठी कट्टा:- जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनच्या आरोग्य विभाग "सुंदर माझा दवाखाना" हा उपक्रम दिनांक ०७ एप्रिल २०२३ ते १४ एप्रिल २०२३ या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले.या उपक्रमामध्ये आरोग्य संस्थांनी सभोतालचा परिसर,सर्व विभाग,स्वच्छतागृहे, भांडार विभाग इत्यादीची स्वच्छता करण्यात यावी तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात दर्शनी भागात सुशोभीकरण,रंगरंगोटी करणे,आरोग्य सेवा यांची जनतेला माहिती व्हावी यासाठी सेवांचे फलक लावण्यात यावे या स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिलेल्या होत्या अर्थातच हा विषय आमच्या आवडीचा आणि एक उपक्रमशील भाग असल्याने त्या प्रमाणे कार्यवाही केली.शासन सेवेत रुजू झाल्यापासून वर्षानुवर्ष करतच होतो  त्यामुळे अहवाल तयार करण्यासाठी फारसे काही कष्ट घ्यावे लागले नाहीत परंतु अगोदरचे फोटो मिळवणे तेवढेच अवघड काम होतं कारण अगोदरची परिस्थिती फक्त आपल्या ध्यानात होती परंतु त्याबाबतचे फोटो (छायाचित्रे) आपल्याकडे काही उपलब्ध नव्हते त्यामुळे सर्वांशी संपर्क साधून छायाचित्रे गोळा करण्याचे काम सुरू केले जी काही छायाचित्रे मिळाली; त्यानुसार सदरील उपक्रमाचा अहवाल सादर करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला.उपक्रमाचा अहवाल तर तयार केला होता परंतु प्रत्येक छायाचित्रे ही काही इतिहासाचे साक्षीदार होती/आहेत (म्हणतात ना एक चित्र हे हजार शब्दांच्या  बरोबरीचे असतात) त्यामुळे त्याबाबतची माहिती ब्लॉगद्वारे मराठी कट्टा द्यावी असे वाटले म्हणूनच हा प्रपंच मांडण्याचे ठरवले.या उपक्रमामध्ये ज्यांचे आम्हाला सहकार्य लाभले त्या वैद्यकीय अधिक्षक मा.उषा चोले मॅडम, सहा.अधिक्षक श्री.राहिरे सर,माझे सहकारी श्री.सानप सर,श्री.ओंकार,श्री.बालाजी सर्व रुग्णालय अधिकारी व कर्मचारी यांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांच्या सहकार्यामुळेच आपण हे करू शकलो आहे.
रुग्णालयाच्या दर्शनी भागाची सजावट करण्याची यशस्वी जबाबदारी अधिपरिचारिका प्रमुख,इतर सर्व अधिपरिचारिका व कर्मचारी यांनी सांभाळली त्यांनी ती अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली.
शासकीय संस्था म्हटल्यावर संस्थेची ओळख दर्शवणारा दर्शनी फलक असणे अत्यंत आवश्यक आहे तिचं त्या संस्थेची ओळख असते परंतु ग्रामीण रुग्णालय मुरुड येथील रुग्णालयाचा फलक हा तुटलेला व मोडक्या अवस्थेत होता त्यामुळे तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रमजीत पडोळे सर यांना सदर विषयाबाबत माहिती दिली त्यांनी तात्काळ  सदर विषयास मंजुरी देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले. मी व माझे सहकारी यांनी सदरचा विषय तात्काळ मार्गी लावला त्यामुळे रुग्णालयाच्या दर्शनी भागात एक चांगला फलक लावू शकलो याचे समाधान आहे.
गेले अनेक दिवसापासून रुग्णालयीन डिजिटल बोर्ड हा स्टोअर रूम मध्ये पडलेला होता त्यावरील रेडियमचे नाव खराब झालेले होते आणि विद्युत कनेक्शन सुद्धा खराबच होते त्यामुळे भंगारत  पडलेला  डिजिटल बोर्ड चालू करण्याचे ठरवले विद्युतचे थोडेफार काम जमत असल्याने त्यामध्ये दोन ट्यूबलाईट बसविल्या आणि सदरचा बोर्ड रुग्णालयाच्या दर्शनी भागात सहकाऱ्यांच्या मदतीने लावण्यात आला टाकाऊ पासून टिकाऊ डिजिटल बोर्ड अद्यापपर्यंत सुरळीत चालू आहे याचां निश्चितच आनंद आहे.
"टाकाऊ पासून टिकाऊ" या संकल्पनेचा पहिल्यापासून पुरस्कर्ता असल्याने भंगारात पडलेला रुग्णालयाचा फलक कार्यालयाचे कोविड 19 कालावधीत नवीन जागी झालेल्या स्थलांतर ठिकाणी लावण्याचे ठरविण्यात आले.त्यामुळे 'प्रशासकीय कार्यालय,वैद्यकीय अधीक्षक दालन व सभागृह हॉल' या स्वरूपाचा टाकाऊ पासून टिकाऊ व उपयुक्त स्वरूपाचा फलक लावण्यात आम्हाला यश आलं.आज त्याच ठिकाणी मा.वैद्यकीय अधिक्षक यांच्या संकल्पनेतील छोटेशे गार्डन करण्यात आलेले आहे त्या गार्डनमध्ये सदरील फलक हा आपली वेगळीच झलक दाखवून देत आहे याचे समाधान नक्कीच आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत प्रत्येक शनिवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे यामुळे रुग्णालयाच्या दोन्ही इमारती (फातिमा बेगम व लेडी कुलसुम बेगम) पूर्णपणे स्वच्छ झालेल्या आहेत या सर्व स्वच्छतेचे श्रेय माननीय वैद्यकीय अधीक्षक यांना जाते.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेचा एक भाग म्हणून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी ग्रामीण रुग्णालय स्तरावर करण्यात आले यामध्ये विशेषतज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली.

सदर आरोग्य शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे नगरपरिषद मुरुड-जंजिरा शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉ. कोकाटे सर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष,आरोग्य दूत श्री विजय सुर्वे त्याचप्रमाणे रुग्णालयीन वैद्यकीय अधिक्षक,वैद्यकीय अधिकारी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ८ मार्च २०२३ जागतिक महिला दिनाच्या निमित्त महिलांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटक व प्रमुख स्त्रीरोग तज्ञ मुंबई डॉ. तृप्ती पोयरेकर मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन व स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरास सुद्धा स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय होती.
 
रुग्णालयाचे गावातील बाह्यरुग्ण विभाग इमारत म्हणजेच लेडी कुलसूम बेगम रुग्णालय पूर्वीचे नाव (बाईचा दवाखाना) या ठिकाणी दैनंदिन ओपीडी,दंत बाह्यरुग्ण विभाग,दैनंदिन लसीकरण हे काम चालते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रुग्णालयाच्या मागणीनुसार सदरील इमारतीला रंगरंगोटी चे काम करण्यात आलेले आहे त्यामुळे पूर्वीचे रुग्णालय आणि आता यामध्ये खूप सारा फरक आपणास दिसून येतो.
त्याचप्रमाणे lkb रुग्णालयाच्या मागील बाजूस असणारे कर्मचारी निवासस्थान याची अवस्था सुद्धा खूप वाईट अशी होती सदरील निवासस्थान हे रुग्णालयाच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत उशिरा का होईना परंतू दुरुस्त करून देण्यात आलेले आहे.
रुग्णालयाची ड्रेनेज लाईन गेल्या अनेक दिवसापासून खराब असल्यामुळे पाणी साठवून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली होती त्यामुळे सदरचे काम हे अत्यावश्यक व तात्काळ करून घेणे आवश्यक असल्याने सदरील दुरुस्ती ही रुग्णालय स्तरावर तात्काळ करण्यात आली.
माननीय वैद्यकीय अधीक्षक यांच्या संकल्पनेतील गार्डन म्हणून ज्याची पूर्वी ओळख करण्यात आली होती तेच हे गार्डन राष्ट्रीय आरोग्य अभियान ODF रुग्णालय सुशोभीकरण या अंतर्गत करण्यात आलेले आहे गेले अनेक दिवसापासून वैद्यकीय अधीक्षक यांचे म्हणणे होते की आपण या ठिकाणी छोटेसे का होईना गार्डन केले पाहिजे  परंतु करायचे कशातून हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता सदरील काम हे निधी अभावी होत नव्हते अखेर मार्च 2023 मध्ये NHM ODF अंतर्गत रुग्णालयास सुशोभीकरणास काही निधी मिळाला आणि त्यातूनच गार्डनचे (बागेचे) काम पूर्ण करण्यात आलेले आहे.यामध्ये अनेक प्रकारचे शोभेची झाडे,मातीचा भराव,तारेचे कुंपण,गेट, समुद्री गोल दगड-गोटे आणि पूर्वी उल्लेख केलेला फलक यामुळे या गार्डनला /पर्यायाने रुग्णालयाला एक वेगळी शोभा प्राप्त झालेली आहे.
अशाच पद्धतीने रुग्णालयाच्या समोर असलेले पूर्वीच्या गार्डनला (बागेला) नव्याने कुंपण,मातीचा भराव व शोभेची झाडे लावण्यात आलेली असल्याने त्यामुळे 🇮🇳राष्ट्रीय ध्वजाच्या ठिकाणी व रुग्णालयीन समोरील भाग यामुळे रुग्णालयांच्या दर्शनी भागास एक वेगळीच रूप प्राप्त झालेले आहे.
एका माथेफिरू स्थानिक रुग्णाने रुग्णालयात रात्री २ च्या सुमारास रुग्णालयाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली त्यामध्ये रुग्णालय दरवाजे,खिडक्या यांच्या काचा फोडण्यात आल्या,कड्या तोडण्यात आल्या त्यामुळे बहुतेक दरवाजे व खिडक्या यांना काचा तसेच कडी-कोंड्या नव्हते.निधी उपलब्ध होताच किरकोळ दुरुस्ती रुग्णालय स्तरावरून करण्यात आली.
रुग्णालयाची शोभा वाढवणारे समोरील दोन वृक्ष म्हणजेच बदामाची दोन झाडे या दोन झाडांचे ओटी\कट्टा (गावाकडील भाषेत पार) असे म्हणतात. ते पूर्णपणे खराब झालेले, तुटलेले होते त्यामुळे सदरील तुटलेले कट्टे बांधणे आवश्यक व गरजेचे होते.राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत मिळालेल्या निधीतून सदरील काम पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. यामुळे रुग्णालयाची शोभा वाढलीच परंतु रुग्णालयात रुग्णसेवेसाठी आलेल्या व्यक्तींना बसण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध झालेली आहे.
महिन्याच्या प्रत्येक पहिल्या शनिवारी स्वच्छता मोहीम ही केलीच जाते या मोहिमेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी स्वस्फूर्तीने सहभागी असतात त्याचेच हे एक प्रतिनिधीक छायाचित्र.
रुग्णालयामध्ये जे काही विविध विभाग आहेत त्यांना त्या ठिकाणी नावे न दिल्यामुळे रुग्णांना व रुग्णालयास भेटी देणाऱ्या व्यक्तींना विभाग समजण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे रुग्णालयातील सर्व विभागांना नावे देण्यात आलेली आहेत.
लेडी कुलसून बेगम रुग्णालय
फातिमा बेगम रुग्णालय
रुग्णालयामधील दरवाजे व खिडक्या यांना पडदे नसल्यामुळे रुग्णसेवा देताना अडचणी येत होत्या ही बाब मा.वैद्यकीय अधिक्षक यांच्या लक्षात आल्याने तात्काळ निधी उपलब्ध झाल्यावर रुग्णालय स्तरावरून दरवाजे व खिडक्या यांना पडदे बसून घेण्यात आलेले आहे.
रुग्णालय शोभा वाढवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध फुलांच्या कुंड्या असणे महत्त्वाचे वाटल्याने रुग्णालयीन स्तरावरून कुंड्या, शोभेची फुलझाडे,माती खरेदी करून त्या कुंड्यांमध्ये विविध शोभेची फुलझाडे नुकतीच लावलेली आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे याची जाणीव कोविड१९ कालावधीमध्ये प्रकर्षाने जाणवली होती त्यामुळे रुग्णालयामध्ये उपलब्ध असणारे जुने कुलर दुरुस्त करून व पाणी फिल्टर विकत घेऊन काही डोनेशनवर मिळालेले अशा एकूण ०३ ठिकाणी २४ तास पुरेल अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रुग्णालयस्तरावरून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत करण्यात आली.
सहज सुचलेली कल्पना म्हणजे आरोग्य पत्रिकांचा संग्रह/वाचनालय रुग्णालयात प्रत्येक महिन्याला विभागामार्फत आरोग्य पत्रिका उपलब्ध होत असतात त्या आरोग्य पत्रिकांमध्ये राज्य शासनाच्या योजना,आरोग्य विभागाची ध्येय धरणे,अधिकाऱ्यांचे लेख इत्यादी महत्त्वाचे माहिती दिलेली असते त्यामुळे सदर माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावी तसेच रुग्णालयास भेट देणाऱ्या व्यक्तींनाही व्हावी यासाठी आरोग्य पत्रिकांचा संग्रह या संकल्पनेतून छोटासे का होईना असे एक वाचनालय आम्ही सुरू केलेले आहे अपेक्षा आहे या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होईल.
एप्रिल आणि मे हे महिने आले की पाण्याचा तुटवडा,पाण्याची समस्या पाणी न मिळणे हे जाणवतच असते या वर्षी तर चक्क पाणीच बंद झाले त्यामुळे रुग्ण सेवा देताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या अडचणी सोडवत असताना जाणवलं की रुग्णालय बोरवेलचे पाणी खूपच खाली गेले असल्यामुळे तसेच त्यामध्ये कचरा,गाळ मोठ्या प्रमाणावर साठल्याने रुग्णालयास पाहिजे तेवढे पाणी मिळत नव्हते त्यामुळे सदरील बोरवेल साफ करून दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक होते.त्यानुसार दरपत्रके मागून सदरील बोरवेलची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आलेली आहे.आज रुग्णालयास भेडसावणारी पाण्याची समस्या सुटण्यास मदत झालेली आहे.
लिहिण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न मी निश्चितच करणार आहे... ब्लॉग  आवडल्यास नक्की लाईक,शेअर व कमेंट करा

क्रमशः 

Post a Comment

0 Comments