ग्रामीण रुग्णालय मुरुड आयोजित महाआरोग्य शिबिर २०२३ ला उस्फूर्त प्रतिसाद.



महाआरोग्य शिबिर २०२३ ला उस्फूर्त प्रतिसाद

========>>>>>>>°<<<<<<<========

             संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अंतर्गत @महाआरोग्य शिबिर -2023,ग्रामीण रुग्णालय मुरुड येथील लेडी कुलसुम बेगम रुग्णालय येथे दि.9.02.2023 रोजी आयोजित करण्यात आले सदर आरोग्य शिबिरात बाल आरोग्य तपासणी,जागृत पालक सुदृढ बालक या योजनांचा शुभारंभ करण्यात आला.


शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


 शिबिराचे उद्घाटन डॉ.मकबुल अहमद कोकाटे,सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय सुर्वे,कार्याध्यक्ष संजीवनी आरोग्य सेवा संस्था मुरुड जंजिरा,श्री आदेश दांडेकर,तालुका प्रमुख शिवसेना,डॉ.शेखर वानखडे,दंत शल्यचिकित्सक,डॉ.आदित्य वने,वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.


मान्यवरांचे स्वागत वैद्यकीय अधिक्षक माननीय डॉ.उषा चोले यांनी केले, 

डॉ.निशिगंधा माळी,वैद्यकीय अधिकारी RBSK यांनी आरोग्य योजनांची माहिती दिली सदर शिबिरामध्ये नेत्ररोग चिकित्सा,दंतरोग चिकित्सा, रक्ताच्या तपासण्या व गरजूंना औषध वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.विठ्ठल शिंदे यांनी केले.


टोल फ्री क्रमांक:- अपघातग्रस्त रुग्णांसाठी 108, बाळंतपणात स्त्रीला दवाखान्यापर्यंत नेणे व आणण्यासाठी 102, ऐच्छिक सल्ला केंद्र 104, चाईल्ड लाईन 1018

========>>>>>>>°<<<<<<<========

Post a Comment

0 Comments