प्रस्ताविक :-
विज्ञान इतके पुढे गेले नाही की शरीराच्या बाहेर अवयव तयार करू शकेल परंतु इतके पुढे नक्कीच आहे की ते एका सुदृढ शरीराकडून अवयव घेऊन गरजू व्यक्तीला देता येईल. अमेरिकेमध्ये पहिले यशस्वी अवयव प्रत्यारोपण १९५४ या काळात झाले.
डॉ.जोसेफ मरे यांना १९९० यावर्षी दोन जुळ्या भावांचे मुत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी केल्याबद्दल फिजिओलॉजी आणि मेडिसिन मधील नोबेल पारितोषक मिळाले होते.
"न भूप्रदानं न सुवर्णदान, न गोप्रदानं न तथान्नदानम् |
यथा वद्न्तीह महाप्रदानम्, सर्वेषु दानेष्व भयप्रदानम् ||"
गीतेमध्ये अवयवदाना बाबतचे महत्व वरील प्रमाणे सांगितले असून याचा अर्थ असा होतो की, भूदान नाही,सुवर्णदान नाही,गो दान ही नाही, तसेच अन्नदानही नाही तर या सर्वदानांपेक्षा अभयदान अर्थातच जीवनदान सर्वात श्रेष्ठ आहे.
त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने अवयव दान सारखे सर्वश्रेष्ठ दान केले पाहिजे व समाजात सुद्धा अवयव दान करण्यासाठी जनजागृती करून प्रोत्साहन दिले पाहिजे असे मला वाटते. असं म्हटलं जातं की शरीर मर्त्य आहे व जीव (आत्मा) अमर आहे परंतु मर्त्य शरीरही आपल्या अमूल्य अशा दायित्वातून अमर होऊ शकते.
इतर देशांची तुलना करता उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात दर दहा लाख लोकसंख्या मागे अवयव दानाचे प्रमाण खूपच नगण्य असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये स्पेन ३५, इंग्लंडमध्ये २७, अमेरिका २६, कॅनडा १४, तर भारतात हे प्रमाण फक्त ०.६५ इतकेच असल्याचे दिसून येत आहे.त्यातही भारतात चेन्नईमध्ये सर्वात जास्त अवयवादानाच्या घटना नोंदविण्यात आलेल्या आहे. याबाबत आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता भारतामध्ये अवयवदाना संबंधी सन १९९४ (मानवी अवयव प्रतिरोपण अधिनियम १९९४ क्रमांक ४२) पीडीएफ साठी येथे क्लिक करा सालचा कायदा असून त्या कायद्याबाबत समाजामध्ये पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही त्यामुळे कदाचित हे प्रमाण कमी असू शकते.
चला तर मग, आपण अवयवदान विषयी जनजागृती/प्रचार व प्रसार करण्यासाठी खारीचा वाटा उचलूया...
अवयव/देह दानाच्या व्याख्या :-
"अवयव दान म्हणजे एका व्यक्तीने (दात्याने) जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर आपले अवयव गरजू व्यक्तीला (स्वीकार करणारा) जीवन वाचवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी दिले जातात."
"आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराची राख करायची की, जातानाही दातृत्वाचा परमोच्च आनंद घ्यायचा याचा निर्णय घेणे म्हणजे अवयव दान करणे आहे."
"मृत्यूनंतर आपले शरीर दान करण्याची इच्छा संकल्पित करणे व ती नातेवाईकांकडून पूर्ण करून घेण्याची व्यवस्था करून ठेवणे म्हणजेच देहदान होय."
त्याच बरोबर अवयव दानाचे प्रकार समजणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
अवयव दानाचे प्रकार --
अवयव दान हे दोन प्रकारे करता येते त्यामध्ये जिवंतपणी व मृत्यूनंतर (मृत्यूनंतर अवयव दान दोन प्रकारे करता येते मेंदूचे निधन Brain Death व नैसर्गिक मृत्यू)
जिवंतपणी अवयवदान :-
यामध्ये दान करताना व्यक्ती जिवंत असताना अवयव किंवा अवयवाचा काही भाग दान करत असते यामध्ये रक्त,यकृत एक लोब,स्वादुपिंड काही भाग, फुफ्फुस एक लोब, एक मूत्रपिंड आणि आतड्याचा काही भाग यामुळे व्यक्तीला जीवन जगण्याची दुसरी संधी उपलब्ध होत असते.
मृत्यूनंतर अवयवदान :-
ज्यावेळेस व्यक्तीचा मेंदू मृत (Brain Death) म्हणून घोषित केला जातो किंवा नैसर्गिक रित्या मृत्यू झालेला असतो त्यावेळी दान केलेले अवयव गोळा केले जातात यामध्ये हृदय,यकृत,फुफ्फुसे,यकृत,मूत्रपिंड,स्वादुपिंड,त्वचा, कॉर्निया - डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा, हाडे,लहान आतडे यासारखे मोठे अवयव दान करता येतात.
नैसर्गिक मृत्यूनंतर : नेत्र (४ ते ६ तासाच्या आत) आणि त्वचा (६ तासाच्या आत) याशिवाय हृदयाची झडप, त्वचेखालील आवरण, बंद कानातील हाडे, रक्तवाहिन्या दान केल्या जाऊ शकतात.
अवयव दानाचे महत्व :-
- मृत्युपश्चात एक देह सर्वसाधारणपणे ८ व्यक्तींच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो तर ५० व्यक्तींच्या आयुष्याचा दर्जा (पूर्ववत आयुष्य) सुधारू शकतो.
- मानवाचे शरीर हे क्षणभंगुर आहे मृत्यूनंतर ते नष्ट होते मात्र अवयव रुपी जिवंत राहायचे असेल तर अवयव दान हाच एकमेव पर्याय आहे अर्थात अवयव दान हा मनुष्याला मिळालेला एक वरच आहे असे म्हणावे लागेल कारण मृत्यूनंतरही पुन्हा एकदा जगातील सुख मिळू शकतो,पुन्हा एकदा निसर्गाचे सौंदर्य बघण्याची,आपुलकीची भावना अनुभवण्याची संधी मिळू शकते.
- अपंग व्यक्तीच्या जीवनाचा दर्जा उंचावू शकतो.
प्रत्येक वर्षी ३ ऑगस्ट हा भारतीय अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो यावर्षी १५ वा भारतीय अवयव दान साजरा केला जात आहे तर जागतिक स्तरावर १३ ऑगस्ट अवयव दिन साजरा केला जातो.
अवयव दानाची वयोमर्यादा :-
- १८ वर्षांपुढील सर्व स्त्री व पुरुष कायद्याने देहदान करू शकतात त्यासाठी जात धर्म असा कोणताही भेदभाव नाही.
- मृत्यूनंतर ध्येय दान करण्याबाबतच्या कायद्यामधील सर्व तरतुदी Bombay Anatomy Act. मध्ये नमूद केलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन,सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारा ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत "अंगदान - जीवन संजीवनी अभियान २०२५- २६" ही मोहीम राबविण्यात येत आहे.
अवयव दान प्रतिज्ञासाठी खालील किंवा QR कोड स्कॅन करा किंवा वेबसाईटला भेट द्या
वृत्तपत्रामधील बातम्यांचे संकलन :-
0 Comments