श्री.क्षेत्र दुर्गेश्वर लेणी - स्वच्छता मोहीम Shri.Kshetra Durgeshwar Caves - Cleanliness Campaign


मराठी कट्टा :- मे २०२३

गेले बरेचं दिवस सुट्टीवर गावी #गडद, ता.खेड, (राजगुरुनगर) पुणे ४१०५०१. येथे असताना आमच्या गावचे जागृत देवस्थान (अद्भुत लेणी) व ट्रेकर्सचे 🧗‍♂️आणि माझे पहिल्या पसंतीचे पर्यटन ठिकाण @श्री.क्षेत्र दुर्गेश्वर लेणी येथे दर्शनाला जाण्यासाठीची खूपच उत्सूकता लागून राहिली होती कारण गेले ५ वर्ष शिक्षण,शासकिय सेवा यामुळे या ठिकाणी जाता आलेले नव्हते...

त्यामुळे घरचे आई,ताई,बायको, दाजी, मोठे बंधू (श्रीकर), भाऊ (लक्ष्मण),मित्र (राजेंद्र शिंदे - आंबोली, सध्या सहायक महसूल अधिकारी, पालघर व उमेश सातकर - महाराष्ट्र पोलीस) यांना सांगून ठेवले होते की, आपल्याला दुर्गेश्वरला जायचे आहे कधी जायचे ते तुम्ही ठरवा...

पण त्यांनी ठरवता ठरवता सुट्टीचे शेवटीचे काही दिवस शिल्लक राहिले होते.

त्यामुळे भाऊ लक्ष्मणला बोललो की चल आपण जाऊन येऊ तो लगेचच तयार झाला आणि सुरू झाला प्रवास...
देवाच्या आंबेराईत पोचलो असता पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या,थर्मासची ताटे इकडे तिकडे पडलेली होती.
भावाला बोललो अगोदर आपण दर्शन घेऊन येऊ मग आपण ही स्वच्छता मोहिम हाती घेऊ...

देव दर्शन घेतल्यानंतरचा हा एक छोटासा प्रयत्न...
यातून मिळालेल्या समाधानाची किमंत कशात करणे अशक्य आहे.

दुर्गेश्वर लेणी संबंधित माहिती देणारे Google वरील प्रसिद्ध लेख/ब्लॉग 🔗 Link 


स्वच्छता मोहिम संबंधित - YouTube व्हिडिओ 



दुर्गेश्वर लेणी - कडे जाताना हा जिवंत पाण्याचा झरा 
आमच्या कडे या ठिकाणाला कोटमा म्हणतात.



Post a Comment

0 Comments