Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojna (MJPJAY)महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

   महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojna (MJPJAY)

राज्यातील जनतेला अधिक चांगल्या व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने "महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना" सुरू केलेली आहे यामध्ये दारिद्र्य रेषेखालील (पिवळे रेशनकार्ड) व दारिद्र्य रेषेवरील (केसरी रेशनकार्ड) या कुटुंबांना उपयुक्त अशी योजना आहे.या योजनेचा प्रारंभ 02 जुलै 2012 रोजी करण्यात आला.

योजनेची उद्दिष्टे:-

• राज्यातील नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी नि:शुल्क व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा लाभ विशेषतज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयामधून देणे.

• योजनेची एकत्रित अंमलबजावणी राज्य आरोग्य सोसायटी, शासकीय विमा कंपन्या व तृतीय पक्ष प्रशासक कंपनी यांच्यामार्फत केली जाते.

• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यामध्ये 996 तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 आजारांवर उपचार केले जातात.

वैद्यकीय सेवेचे स्वरूप:-

• रुग्णालयातील खाटा, आवश्यक औषध उपचार, निदान सेवा, शुश्रूषा व भोजन, भूल सेवा व शस्त्रक्रिया, आणि रुग्णालयातून सुट्टी केल्यावर पाठपुरावा सेवा,10 दिवसापर्यंत गुंतागुंत निर्माण झाल्यास मोफत उपचार व एक वेळचा परतीचा प्रवास.

योजनेचे वैशिष्ट्ये:-

• 196 उपचार व 121 सेवा.

• विमा हप्ता शासनाकडून भरला जातो.

• सर्व सेवा नि:शुल्क मिळतात.

• लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी दीड लाखापर्यंत विमा संरक्षण..."महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना विमा संरक्षण १.५ लाख वरून ५ लाख करण्याचा निर्णय" (संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा) new 

• मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा अडीच लाखापर्यंत.

• विमा रकमेच्या मर्यादित कुटुंबातील सर्व व्यक्तींना लाभ घेता येईल रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य मित्रांची उपलब्धता.

• जवळच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये रेशन कार्ड दाखवून योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेच्या माहितीसाठी नि:शुल्क दूरध्वनी सेवा 

155 388/ 1800 233 2200

लाभार्थी:-

• अ वर्ग अन्न नागरी पुरवठा विभाग यांच्याकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना व केसरी (एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

ब वर्ग औरंगाबाद अमरावती  विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त, आत्महत्याग्रस्त शुभ्र/पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

क वर्ग आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्ध आश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे, महाराष्ट्र इमारत व बांधकाम मंडळाकडे नोंदणीकृत कामगार व त्यांचे कुटुंबे हे सुद्धा या योजनेची लाभार्थी आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे.

1) महाराष्ट्राचे कायम रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.

2) पासपोर्ट आकाराचा फोटो.

3) शिधापत्रिका (रेशन कार्ड), (आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि ०७/१२ उतारा आवश्यक आहे)

4) वर्ग अ,ब,क मधील कोणतेही एक दस्ताऐवज.

5) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधील कोणतेही एक दस्तऐवज.

6) खाली दिलेल्या यादीतील अर्जदाराचे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक आहे.

•आधार कार्ड •पॅन कार्ड •पासपोर्ट [पारपत्र] •शाळेतील कोणते एक ओळखपत्र •स्वतंत्र सैनिक ओळखपत्र •महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ओळखपत्र •अपंगत्व ओळखपत्र •फोटो असणारे बँकेचे पासबुक इत्यादी.

     महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ऑफिशियल वेबसाईट

       👇       

   https://www.jeevandayee.gov.in/

 
Important Links महत्वाचे दुवे

अ.क्र माहितीचा तपशील लिंक/डाउनलोड
१. न्यूज पेपर कटिंग Click Here
२. हॉस्पिटल नेटवर्क Click Here
३. आरोग्य मित्र Click Here
४. सक्सेस स्टोरी Click Here
५. शासन निर्णय Click Here
६. पीएम-जेएवाय Click Here




































 
New Update:-
 



शासन निर्णय :- Click Here

Post a Comment

0 Comments