महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना mjpjay व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना pmjay मदत केंद्र
सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारावर मोफत उपचार देण्यासाठी राज्य शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात आहे.या योजनेअंतर्गत (एकत्रित आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना) १ हजार ३५६ आजारांवर मोफत उपचार केले जातात.
या योजनेत उपचारासाठी निवडलेल्या रुग्णालयांमध्ये खासगी,विश्वस्त संस्थांची रुग्णालये तसेच सर्व सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय मुरुड जि.रायगड या रुग्णालयाचा सुद्धा या योजनेत समावेश झालेला असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मदत केंद्र सुरू करण्यात आले.त्याचे नुकतेच उद्घाटन वैद्यकीय अधिक्षक डॉ.उषा चोले यांच्या हस्ते झाले सद्यस्थितीत जास्तीत जास्त गरजू व्यक्तींनी एनरोलमेंट Enrollment (त्यासाठी रेशनकार्ड व आधारकार्ड असणे आवश्यक आहे.) मदत केंद्रात #आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधून करून घ्यावे.
• आभाकार्ड (Abha Card)
• आयुष्यमान कार्ड (Ayushaman Card)
काढून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक यांनी केले.
0 Comments