वृक्षारोपणाच्या अनोख्या उपक्रमाविषयी थोडक्यात...


Abp Maza ची बातमी वाचण्यात आली सदरच्या बातमीमध्ये पर्यावरणाचा होत चाललेला रास त्यामुळे होणारे दुष्परिणाम व वृक्षारोपणाचे अनन्य साधारण महत्व ओळखून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील किंजवडे ग्रामपंचायती मार्फत विवाह प्रमाणपत्र धारकांद्वारे राबविण्यात येणारा वृक्षारोपणाचा उपक्रम खरोखर स्तुत्य आहेच...पण मनात विचार आला या उपक्रमाचे जनक तर आमच्या ग्रामीण रुग्णालय मुरुड-जंजिरा,जि.रायगड पूर्वीचे वैद्यकीय अधिक्षक आदरणीय डॉ.विक्रमजित पडोळे सर, (सध्या राजभवन येथे माननीय राज्यपाल यांचे स्वीय सहायक) हेच आहेत सरांनी सुरू केलेला उपक्रम आजही आम्ही माननीय वैद्यकीय अधिक्षक डॉ.उषा चोले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत आहोत...


रुग्णालयात राबवत असलेल्या उपक्रमाचे स्वरूप थोडे वेगळे आहे...


मुरुड शहरी भागातील विवाह प्रमाणपत्र देण्याचा अधिकार वैद्यकीय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय मुरुड यांना असल्याने विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी येणारे विवाहित यांच्याकडून एक विवाह प्रमाणपत्र एक झाड रुग्णालयाच्या आवारात लावून घेण्याचा उपक्रम असून...यामध्ये सदरील विवाहित जोडप्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (सर्वसाधारणपणे ८०,९० टक्के) आम्हाला मिळत आहे त्यामुळे रुग्णालयाच्या आवारामध्ये बऱ्यापैकी झाडे लावण्यात आलेली आहे...





सिंधुदुर्ग मधील किंजवडे ग्रामपंचायत राबवत असलेल्या उपक्रमाचे स्वरूप असे की,


ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुठेही ०२ झाडे लावण्यात यावी व त्याचे फोटो सादर करावे त्यानंतरच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल असे आहे...


या उपक्रमा विषयीच्या प्रतिक्रिया नागरिकांनी आम्हाला जरूर कळवाव्यात...तुमचं सहकार्य, प्रतिक्रिया आणि सहभाग हेच आमचं ऊर्जास्थान आहे...

Post a Comment

0 Comments