सार्वजनिक आरोग्य विभाग "महा-आरोग्य फिल्म फेस्टिवल 2022 "आरोग्य जागृतीसाठी कल्पक उपक्रम......
सार्वजनिक आरोग्य विभागाने महा आरोग्य फिल्म फेस्टिवल
या महोत्सवाचे उद्दिष्ट आरोग्याच्या जनजागृती साठी आणि आरोग्याविषयीच्या शिक्षणामध्ये लोकांचे योगदान वाढावे या साठी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. चित्रपट निर्माते, निर्मिती कंपन्या, सार्वजनिक संस्था, स्वयंसेवी संस्था, समुदाय, विद्यार्थी आणि चित्रपट शाळांना त्यांच्या आरोग्यावरील मूळ लघुपट सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे . आरोग्य समस्यांना मांडण्यासाठी ,जनजागृती करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट आणि जन संवादातील नवं तंत्रज्ञान या द्वारे व्हिडिओ इनोव्हेटर्सच्या नवीन पिढीला एक व्यासपीठ व कला गुणांचा सन्मान व लोकसहभाग वाढविणे हा महोत्सवाचा उद्देश आहे.
चित्रपट हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम असल्यामुळे आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक आरोग्य योजना या विषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी,
विविध आरोग्य विषयक कार्यक्रम आणि योजना प्रभावी अश्या दृकश्राव्य माध्यामातून जनमानसात पोहोचाव्यात आणि चित्रपटकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने,
सार्वजनिक आरोग्य विभाग, "महा-आरोग्य फिल्म फेस्टिवल " आयोजन करीत आहे.
देऊनी आरोग्य शिक्षण| सुज्ञ करू प्रत्येक जण||
ध्येय एकचि जाण| आरोग्य संपन्नतेचे ||
या उक्तीनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग विविध माध्यमातून आरोग्य शिक्षण तळागाळात पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य शिक्षणाचे महत्व अनन्य साधारण आहे.
लोकांनी आपल्या आरोग्यासाठी काळजी घेत आरोग्यासाठी जागृत होऊन लोकजागर ,आरोग्य शिक्षणासाठी जनजागृती करावी व आरोग्य विषयावरील चित्रपटासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे .
स्पर्धा दोन विभागात घेण्यात येते.एक आरोग्य विषयक व्हिडिओ स्पॉट (कालावधी 1 मिनिटापर्यंत), व माहितीपट/ लघुचित्रपट (कालावधी 10 मिनिटांपर्यंत).
आरोग्य शिक्षण ,लोक जागराकरिता या फेस्टिवलचे आयोजन केले जाते ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि प्रवेश विनामूल्य आहे.
आरोग्य शिक्षणासाठी लोकसहभाग लाभावा ,विविध विषयांवर जनजागृती व्हावी यासाठी हा विशेष उपक्रम आहे . लोकांनी लोकांसाठी लोकांचे प्रश्न ओळखून ते कल्पक रीतीने मांडून वर्तनात बदल घडवण्यासाठो योगदान दयावे या साठी हा उपक्रम कल्पकतेने सुरू करण्यात आला आहे . विषयातील तज्ज्ञ परिक्षकाडून प्राप्त फिल्म्सची निवड करून विजेत्यांना बक्षीस व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते . युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना ,नॅशनल फिल्म अर्काव्हिव ,आय एम ए यांचाही यास सहभाग लाभत आहे . या चित्रपट महोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार केलेली फिल्म दि. 7 मार्च 2022 पर्यंत iecmaff22@gmail.com या ई-मेल आय. डी. वर पाठवावी. अधिक माहितीसाठी https://mahaarogyasamvadiec.in/maff-2022/ ला भेट द्या.
या उपक्रमात सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले आहे.
#राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग ,पुणे # IECBureau
0 Comments